झाली की नाही रामरक्षा पाठ? पुस्तक नाही, म्हणून रडत बसला असता, तर झाली असती का? अरे, आपल्याला हात, पाय, डोळे सारे आहे. स्वत:च्या पायांवर उभे राहावे. ज्याला बुध्दी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही आहे. असाच कष्ट करून मोठा हो. परावलंबी कधी होऊ नको. परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव. दुसर्याापेक्षा आपल्याला अधिक काही येते, या गर्वाने कोणाला हिणवू नकोस. कोणाला तुच्छ लेखू नकोस. दुसर्यारलाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे.' असे बोलून आईने वही हातात घेतली. तिला आनंद झाला. कृतार्थता वाटली.' या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले, की झाली खरी रामरक्षा! तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र. त्याच्या दुकानातील कापडावरून असतात. माग त्याच्याजवळ व चिकटव. तू आज देवाला फार आवडशील, हो श्याम! कारण तू स्वत: कष्ट करून, सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस!'
रात्र अठरावी: अळणी भाजी
स्तंभितच झाले. 'तुला इतके दु:ख होत असेल हे नव्हते मला माहीत. मी लौकरच लहानसे घर बांधतो.' असे वडिलांनी आश्वासन दिले.
माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळविण्यासाठी दागदागिने फेकून दे, स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार होय.
आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधावयास आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या. कच्च्या विटा. त्यात कोकणात मापे असतात. विटाहून आकाराने मापे मोठी असतात. ह्या मापांच्या भिंती उभारल्या. घर गवताने शाकारिले. घरातील जमीन