राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, 'राम! मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टीही ऐकावयास मिळतील, मला त्या फार आवडतात.'
राम म्हणाला, 'त्यांना गोष्टी म्हणावे, का प्रवचने म्हणावी; व्याख्याने म्हणावी, का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते.'
राजा म्हणाला, 'श्याम बोलतो, त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते. म्हणून सांगण्याला एक विशेषच माधुरी असते. म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो.
"अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोक्ते आहेत. सगळाच रूपया शुध्द चांदीचा असेल, तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुध्द धातू मिसळावी लागते, तेव्हाच तो खण् वाजतो व व्यवहारात चालतो.' राम म्हणाला.
तयार करण्यात आली. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले. आईला वाईट वाटत होते व आनंदही होत होता. शेजारी दिरांची मोठ मोठाली घरे, बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई; परंतु पुन्हा ती म्हणे, 'काही झाले तरी हे स्वतंत्र आहे. येथे मी मालकीण आहे. येथून मला कोणी 'ऊठ' म्हणणार नाही.'
झोपडीवजा घराची वास्तुशांती करण्यात आली. प्रथम घरात देव नेऊन ठेविले. मग सामान नेले. नारळाचे घाटले आईने केले होते. प्रसंग साजरा केला पाहिजे