"माझ्या मनात एक विचार आहे. तुला सांगू? तू हसशील.' राजाने विचारले.
"सांग, मी हसणार नाही. कोणाच्या खर्यान भावनांना मी कधी हसत नाही.' राम म्हणाला.
"श्यामच्या या आठवणी प्रसिध्द केल्या तर? मुलांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील; आईबापांस त्या उपयोगी पडतील; श्यामच्या सांगण्यात कोकणातील संस्कृती भरलेली आहे. या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे. नाही?' राजाने विचारले.
"परंतु श्यामला ते आवडणार नाही. त्याला आत्मविश्वास नाही. कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य, भडक पाहिजे. 'त्यांना 'लैला-मजनू' च्या गोष्टी पाहिजेत. असे तो म्हणतो, 'राम म्हणाला.
त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली. प्रार्थनेची घंटा. दोघे मित्र आश्रमात जावयास निघाले. श्याम राजाची वाट पहात होता. राजा व राम दोघे येताना त्याला दिसले. 'आज मला नाही रे हाक मारलीत? अगदी दोघेच गेलात?' श्यामने विचारले.
होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांना सांगत होते, 'तात्पुरते बांधले आहे. पुढे मोठे बांधू.'
परंतु आई आम्हास म्हणे, 'यांच्या हातून मोठे घर आता केव्हा, कोठून बांधले जाणार? मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल; परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे. कारण येथे मी स्वतंत्र आहे. येथे मिंधेपणा नाही. येथे खाल्लेली मीठभाकर अमृताप्रमाणे लागेल; परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदीपुरी नको.'
त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केंव्हाच मावळला होता. आईला