शिते दिसली, तर रागावत व म्हणत, 'मथुरीचे एक कोंबडे जेवेल, इतकी शिते सांडली आहेस. कर गोळा सारी.' 'अमुक वाईट, हे असेच झाले, याला चव नाही.' वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सारेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे. 'राजमान्य !' त्यांना कोणी विचारावे, 'भाजी कशी झाली आहे?' त्यांचे उत्तर ठरलेले असे. 'राजमान्य.' जेवणाची कोणतीही खोडी त्यांना नव्हती.
एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळास गेले, म्हणजे आम्ही पाटपाने घ्यावयास लागत असू. भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवीत असू. 'आई, भाऊ आले, भाऊ आले. भात उकर.' वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणीत, ते आम्ही घेतले, म्हणजे जेवणे सुरू होत.
त्या दिवशी आम्ही जेवावयास बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करावयास येत असे. भोपळीचा
हो आई! तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे. त्याला आपले साधे घर, हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल. यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शितकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येत, असे त्या हरिविजयात नाही का? तसे हे घर पाहावयास ते तारेही येती. कारण आपल्या घरात प्रेम आहे, तू आहेस.' मी म्हटले.
माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली, 'श्याम! कोणी रे तुला असे बोलावयास शिकविले? किती गोड व सुंदर बोलतोस? खरेच आपले हे