बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते, तो भाजी अळणी! मीठ नाही मुळी तीत. मी जवळच होतो.
आई म्हणाली, 'काय, रे श्याम! भाजीत मीठ मुळीच नाही. तुम्ही कोणी बोललेही नाहीत. श्याम सांगावे की नाही रे! अळणी कशी रे भाजी खाल्लीत?'
मी म्हटले, 'भाऊ बोलले नाहीत, म्हणून आम्हीही बोललो नाही!'
आईला वाईट वाटले, 'मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे सार्यांीनी.' ती म्हणाली. तिला रूखरूख लागली. ती पुन्हा म्हणाली, 'तरीच तू खाल्ली नाहीस. नाही तर बचकभर भाजी तूच खायचा. निम्मी तूच संपवायचा. तुला गुलामा, भाजी हवी पुष्कळ, माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते. परंतु आता काय बोलून?'
आपली मोठी चूक झाली, असे आईला वाटले. जी वस्तू दुसर्यायला करून द्यावयाची, ती चांगली करून द्यावी. जो पदार्थ करून द्यावयाचा तो चांगला करून द्यावा. मग भाजी असो, की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला,
म्हणाला.
'बरे असू दे दिवा. तुम्हाला ज्यात आनंद, त्यातच मला,' असे म्हणून श्यामने गोष्टीस सुरूवात केली:
एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचे अंगण भले मोठे लांब व रुंद होते. तुळशीच्या अंगणात एक उंचच उंच बेहेळयाचे झाड होते. एकाएकी टप् असा आवाज झाला. मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला, ते पाहू लागलो. काहीतरी पडले होते खास. आम्ही सर्वत्र शोधू लागलो. शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले. त्याची छाती धडपडत होती. फारच