स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलीक व गणित विशारद रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे ह्याच तालुक्यातील.
दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे. त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानांवर पडतो. काजूची झाडेही पुष्कळ आहेत; उन्हाळयात लाल, पिवळे, शेंदरी असे हे काजू झाडावर हंडयाझुंबरासारखे डोलत असतात! दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टिसौंदर्यांची माहेरघरे आहेत.
दापोलीची इंग्रजी शाळा त्या वेळेस मिशनची होती. दापोलीचे छात्रालय एके वेळी मुंबई इलाख्यात गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्याची झाडे भरपूर होती. फारच रम्य दिसे शाळा. या शाळेत मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाले.
दापोलीहून माझा गाव सहा-साडेसहा कोस होता. पायाचे मी एवढे चालून जाईन की नाही, याचा मला आत्मविश्वास नव्हता; परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. त्या वेळेपासून मी
दुसरे पोहत असले, म्हणजे मी मजा पाहावयास जात असे. परंतु स्वत: मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उडया टाकीत. परंतु मी मात्र भित्री भागुबाई! 'ढकला रे श्यामला!' असे कोणी म्हटले, की मी तेथून पोबारा करीत असे.
माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, 'अरे श्याम! पोहायला शीक. ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती? तुला बुडू का देतील इतके सारे जण? उद्या रविवार आहे. उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू,