व प्रेम यांचा मी भुकेला होतो. जणू या दोन वस्तू शेकडो जन्मांत मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचाच जणू मी उपाशी होतो! मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल; पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल? प्रेम हे जीवनांचे जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोसते. वृक्षाच्या पानापानांत, फांद्याफांद्यात, सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो, तसे प्रेम पाहिजे. सोडावॉटरची बाटली फोडली, की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभर उतू जाणारे; परंतु दुसर्याो क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास, देऊ शकत नाही.

त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो लोकमान्य टिळक म्हणत असत, 'मी सिंहगडावर दोन महिने जाऊन राहतो. दोन महिने तेथील शुध्द व स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते!' माझीही जणू तशीच स्थिती होती.


215 of 468

राहणार नाही, असे मी नक्की ओळखले होते. मी माळयावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण आठ वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू आले.

'श्यामची आई! श्याम येणार आहे ना आज पोहायला? ह्या पाहा सुखडी आणल्या आहेत.' बन्या म्हणाला.

'हो, येणार आहे; परंतु आहे कोठे तो? मला वाटले, की तुमच्याकडेच आहे. श्याम! अरे श्याम! कोठे बाहेर गेला की काय?' असे, म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो.

मुले म्हणाली, 'तिकडे आमच्याकडे


215 of 773