दर आठ दिवसांनी घरी जावयाचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचे. या हवेवर प्रेमहीन जगात आठ दिवस राहावयाचे व घरी जावयाचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजते आहे की, प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिले नाही, जळू दिले नाही, त्याला पाणी घातले सुकू दिले नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल. मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात, बाळपणी प्रेम मिळाले नाही, ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो, तेच देतो.

मी रस्त्याने जात होतो. मधून मधून डोळयांतून अश्रू येत होते, या, साडेसहा कोसांच्या रस्त्यावर वाटेत किती तरी खेडी आहेत. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजणी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक सबंध


216 of 468

नाही बोवा आला. कोठे लपून तर नाही बसला? आम्ही वर पाहू का, श्यामची आई?

आई म्हणाली, 'बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर-घुशीसारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माच्याखाली लपून बसला होता; पण वरती जरा जपून जा हो. तो तक्ता एकदम वर उचलतो. अलगत पाय ठेवून जा.'

मुले माळयावर येऊ लागली. आता मी सापडणार, असे वाटू लागले, मी बारीक बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही.


216 of 773