मी अंगणात दिसताच 'अण्णा आला, अण्णा आला,' असे धाकटे भाऊ आनंदाने जयजयकार करू लागले व मला बिलगले. मी घरात गेलो.

आई म्हणाली, 'उशिरा का निघालास? जरा लौकर निघावे, की नाही? बाहेर रात्र झाली.'

मी म्हणालो, 'माझ्याच्याने चालवतच नव्हते. जणू गळून गेल्यासारखे होते.'

'मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रातीस यावयाचे.' आई म्हणाली.

'आई! मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस, की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन.' असे म्हणून मी आईला बिलगलो व रडू लागलो. आईलाही रडू आले व भावांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले.


'हे कढत पाणी घे व पाय धू. थांब, थोडे तेल लावत्ये. मग वर कढत पाणी घे.' असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावीत होती व मी तिच्याकडे पाहत होतो. मला


218 of 468

वर? मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला. नेल्याशिवाय राहू नका!' आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले. ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावीत होतो.

'श्यामची आई! तो काही येत नाही व हलत नाही.' मुले म्हणाली.

आईला राग आला व ती म्हणाली, 'बघू दे कसा येत नाही तो. कोठे आहे कार्टा-मीच येत्ये थांबा.' आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढिले. ती मला फरफटत


218 of 773