त्या वेळेस किती आनंद होत होता! त्या वेळच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छीत नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती. पवित्र होती.
मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. 'अण्णा, गोष्ट सांग, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव.' असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आलेले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाहीत. बाहेर पाय धुऊन आले व संध्येला बसले.
'का, रे, संध्या वगैरे झाली का तुझी? त्यांनी मला विचारले. त्या वेळेस मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजत नसे. तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे. 'नाही केली, करतो.' मी म्हटले.
'तेथे चुलीजवळ काय बायकासारखा बसला आहेस? ऊठ. संध्या वगैरे करायची.' ते रागाने बोलले.
आई म्हणाली, 'आताच तो आला. दमला आहे अगदी.
ओढू लागली. तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती व दुसर्या हाताने ती शिंपटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली.
'तुम्ही हात धरा व ओढा. मी पाठीमागून हाकलते व झोडपते चांगला! बघू कसा येत नाही तो!'
मुले मला ओढू लागली व आई शिंपटीवर शिंपटी देऊ लागली. 'नको ग आई मारू! आई, आई मेलो!' मी ओरडू लागलो.
'काही मरत नाहीस! ऊठ, तू उठून चालू लाग. आज मी सोडणार नाही तुला. पाण्यात चांगला दोन चार वेळा बुडवा रे याला. चांगले नाकात तोंडात