गळून गेल्यासारखे वाटते, म्हणाला. जरा बसला आहे. श्याम! जा, संध्या वगैरे कर.'
मी उठलो व पाटावर बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व आचमने घेऊ लागलो. माझ्या डोळयांतील पाण्याची देवाला शतअर्ध्ये सुटत होती.
वडील पुन्हा म्हणाले, 'तिकडे संध्या वगैरे करतोस, की नाही? आणि हे केवढे डोके वाढले आहे? हजाम मिळत नाही, वाटते? नुसता कावळा झाला आहे! मी तेथे आलो होतो तेव्हा बजावले, की डोके करून घे, म्हणून. का केले नाहीस? तुला शिंगे फुटायला लागली. उद्या सकाळी त्या गोंद्या न्हाव्याला नाही तर लख्या न्हाव्याला, बोलावून आण व डोके तासटून घे. नाही तर येथे राहू नकोस. निघून जा.'
मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो, मला शिव्या मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती, दगड मिळाले. मला माझा हुंदका आवरेना. त्याचा स्फोट झाला. 'झाले काय रडायला? कोणी का मारले आहे? सोंगे आणता येतात सारी.' वडील म्हणाले.
'पण करील
पाणी जाऊ दे. ऊठ. अजून उठत नाहीस? लाज नाही वाटत, भिकारडया, लपून बसायला? त्या मुली आल्या बघ फजिती बघायला!' असे म्हणून आईने जोराने मारणे चालविले.
'जातो मी. नको मारू!' मी म्हटले.
'नीघ तर. पुन्हा पळालास तर बघ. घरात घेणार नाही!' आई म्हणाली.
'श्याम! अरे मी सुध्दा उडी मारते. परवा गोविंदकाकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारिली. मजा आली.' वेणू म्हणाली.
'सोडा रे त्याचा हात. तो येईल हो. श्याम! अरे, भीती नाही. एकदा उडी मारलीस, म्हणजे तुझा धीर आपोआपच