उद्या डोके. तेथे पैसे द्यायला लागतात, जवळ नसतील. नसेल केले. तेथे पुन्हा दहा वाजता शाळेत जायचे. श्याम! उगी. हो! संध्या झाली का? आरती करा. मी पाने वाढते. भुकेलेला असशील' आई अमृतमय वाणीने बोलते होती. मला जीवन व मृत्यू, अमृत व विष यांचा अनुभव येत होता. उन्हाळा पावसाळा, शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता.

आरती झाली. पाने वाढली. आम्ही जेवावयास बसलो. आईने मला दही वाढले. मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता; त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही, असे बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. त्या वेळेस माझ्या शरीरास कोठेही बोट लावले असते, तर चटकन पाणीच बाहेर आले असते. जणू अश्रुमय मी बनलो होतो. आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या


221 of 468

चेपेल. मग आम्ही नको म्हटले, तरी तू आपण होऊन उडया मारशील. रडू नकोस.' बन्या म्हणाला.

देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरूण होतेच. 'काय, आज आला का श्याम? ये रे. मी सुखडी नीट बांधतो, हो.' अस म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेत सुखडी बांधल्या. विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. 'हं, मार बघू नीट आता उडी.' बाळू म्हणाला.

मी आता डोकवावे पुन्हा मागे यावे, पुढे होई, पुन्हा मागे. नाक धरी, पुन्हा सोडी. असे चालले होते.


221 of 773