पहाटेची वेळ। दूर कोंबडा आरवे

परी बाळा झोपी जावे। लहान तू ॥ अंगाई॥

पहाटेची वेळ। वाजू लागती रहाट

बाळा तू रे पाळण्यात। झोप घेई ॥ अंगाई॥

पहाटेची वेळ। का का करितो कावळा

झोपे परि माझ्या बाळा। उठू नको ॥ अंगाई॥

पहाटेची वेळ। कामाची आहे घाई

बाळा, तू झोप घेई। आई म्हणे ॥अंगाई॥

मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटले, 'आई! मी आपला निघून जातो. मी येथे राहात नाही. मी आलो, तर भाऊ किती रागे भरले! ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे.'

आई म्हणाली, 'असे नको हो, श्याम करू. हे चांगले का? अरे, ते बोलले तरी त्यांच्यात मनात का असते? बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा, रागावलेले असतील, म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे. तुला कळत का नाही? त्यांचे मन निराश असते. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढविले, तर दोन शब्द बोलण्याचाही


223 of 468


'घाबरू नकोस. घाबरलास म्हणजे लौकर दम लागतो. एकदम कडेला धरावयाला नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये.' बाळू वस्तुपाठ देत होता.

'आता फिरून उडी मार. चढ वर.' बन्या म्हणाला.

मी पायर्यार चढून वर आलो, नाक धरिले. पुढे मागे करीत होतो; परंतु शेवटी टाकली एकदाची उडी!

'शाबास, रे श्याम! आता आलेच पोहणे भीती गेली की सारे आले.' बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरिले व आणखी शिकविले. 'आता आणखी एक उडी मार. म्हणजे आज पुरे.' सारी मुले म्हणाली.


223 of 773