त्यांना अधिकार नाही का? इतकी वर्षे तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून, स्वत: फाटकी धोतरे नेसून, ते पैसे देतात. ते तू या दोन शब्दांमुळे विसरून का जावे? आणि डोके वाढले आहे, म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहात, म्हणून बोलले. उद्या मोठे झालात, तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे? आईबापांना बरे वाटावे, म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावे का? आईबापांच्या धर्मभावना दुखाविल्या जाऊ नयेत, म्हणून इतकेही तू करू नयेस का?' आई मला समजावीत होती.

'केसात कसला आहे, ग, धर्म?' मी म्हटले.

आई म्हणाली, 'धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावे, काय प्यावे, यातही धर्म आहे. केस तरी तू का रे ठेवतोस? मोहच तो. मोह सोडणे म्हणजे धर्म.'

मित्रांनो! माझ्या आईला त्या वेळेस मला नीट पटवून सांगता


224 of 468



वर येऊन मी उडी टाकिली. बाळूने न धरिता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुखडी होत्या, म्हणून बुडण्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला. पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्याबरोबर मला पोचवावयाला आली.

बन्या म्हणाला, 'श्यामची आई! श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली. मुळी भ्यायला नाही आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळूकाका म्हणाले, की 'श्याम लौकरच शिकेल चांगले पोहायला.'

'अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम डोके


224 of 773