निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घालावयाचे, वाफेवर हे उकडावयाचे, उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो.

वडिलांची घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाडीने नीरांजन लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आगकाडया वापरीत नसत. पूजा करून वडील देवळास गेले. मी एक नारळ फोडला. पातोळयाजवळ बोळू काय? पातोळा कशाबरोबर खावयाचा? कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्नशुध्दि करून घेतात! कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खाववयाचा; मग तो खोवलेला नारळ थोडे कढत पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुस्करावयाचा; नंतर तो पिळून त्याचा रस काढावयाचा. हा नारळाचा रस. त्याला आंगरस म्हणतात. तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो. त्या आंगरसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी वगैरे पक्वान्ने कोकणात खातात. मी चांगला घट्ट आंगरस काढला. जेवणाची तयारी


229 of 468

होते. शेवंतीवाङनिश्चय जेव्हा करितात, तेव्हा उभय मंडपात-वधूवर मंडपात-दक्षिणा वाटतात. आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात. वधूघरचा एक उपाध्याय व वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात. जितकी वराकडची तितकीच वधूकडची. वराकडच्यांनी चार चार आणे दिले, तर वधूपक्षही चार चार आणे देतो. जो हात पुढे करील, त्याला दक्षिणा देण्यात येत असते. लग्नाला जेव्हा मंडळी जाते, तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळीजवळच बसलेली असली, तर हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते. 'अरे, आपण नाही हो हात पुढे करावयाचा' वगैरे ते मुलांना सांगतात.


229 of 773