गावाची हद्द संपते, तेथे एक मोठे बेहळयाचे झाड आहे. ते माघारे गेले व मी एकटाच चालू लागलो.

आईबापांचे प्रेम मनात येऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीहून घरी गेलो, तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी रडत गेलो. आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होतो. सुखाचे अश्रू व दु:खाचे अश्रू! वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, 'का रे मुला, रडतोस? तुला कोणी नाही का?

मी त्याला म्हटले, 'माझे आईबाप आहेत.'

'ते तुझ्यावर प्रेम नाही का करीत, तुला घालवून लाविले का त्यांनी?'

'नाही. ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही, म्हणून मला वाईट वाटत आहे. त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई होऊ? खरेच कसा बरे उतराई होऊ? या विचाराने मला रडू येत आहे!' विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणे पाहून निघून गेला. मीही जलदीने चालू लागलो.


234 of 468

ते आपले काम नाही. आपण दुसर्या ला द्यावी. भटजी वेद शिकतात, धार्मिक कामे करतात, त्यांना शेतभात नसते, ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न.'

मी म्हटले, 'आपल्या गावातील ते पांडूभटजी किती श्रीमंत आहेत! त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का? सावकारी करतात; शेतीभाती आहे. हे असले कसले भटजी?'

आई म्हणाली, 'तो त्यांचा दोष. पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली, तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत; घरी मुले शिकावयास ठेवीत. त्या पांडवप्रतापात नाही का, की नळराजाने ब्राह्मणास खूप धन दिले. ते धन ब्राह्मणांनी


234 of 773