तो नरकास जातो. सत्कर्म सिध्दीस जावे म्हणून सर्वांनी झटावे. आमची आजी कोणाही बाईसाठी दूर्वा खुडायच्या असोत, तेथे हजर. आम्हांस जर कोणी विचारले, 'आजी कोठे आहे,' तर आम्ही सांगावे, 'गेली दूर्वांना.' असे करता करता त्या आजीचे नावच मुळी 'दूर्वांची आजी' असे पडले. आम्ही मोठे झाल्यावरही तिला दूर्वांची आजी असेच म्हणत असू.
दूर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते. उन्हाळयामध्ये जर पाणी आटले, तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्याने पाणी घागरीत भरी व आई वर ओढून घेई. रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिने चोर पकडले होते! तिला भीती ही वस्तूच माहिती नव्हती. तिला अंगारा मंतरता येत असे. मुले आजारी पडली, गुरे एकदम दूध देतनाशी झाली, तर आजीकडे अंगारा यावयाचा. अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभया आल्या, तर दृष्ट फार वाईट पडली, असे ती म्हणे. गुरांच्या अंगार्यारबरोबर पेंडीचा तुकडा आणीत.
जगणे हेही पापच. जगाचे मिंधे होणे नको. युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकविण्यात येत असते. आईबापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंधेपणा व कमीपणा मानतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट हूव्हर यांची गोष्ट सांगतात. त्यांनी आपल्या तेरा वर्षे वयाच्या मुलास मजुरीने काम करावयास पाठविले. धनाढय अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हूव्हर होते; परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंडयाच्या हातांखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते. ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावरून