होते; परंतु आजी जरा लहरी होती. आदल्या दिवशी तीच म्हणाली होती, 'उद्या करू हो भाजणी.' परंतु उजाडत आजीला खर्यां कडून बोलावणे आले. खर्यांीकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. मधून मधून ती त्यांच्याकडे जात असे. बाकी आजी म्हणजे गावआजी होती. सर्वांकडे तिचा घरोबा व सारी जणे तिला बोलावीत असत. खर्यांकच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते, म्हणून आजीला तिकडेच जेवायला वगैरे व पापड घालण्यास बोलावण्यासाठी तो मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला 'येत्ये. तू जा' असे सांगून पाठविले.
आईला राग आला. आता भाजणी कशी होणार? जाते कसे ती एकटी ओढणार?
आई आजीला म्हणाली, 'तुम्ही जाणार, येथे भाजणी कशी होईल?'
'मी काय पत्कर घेतला आहे, की काय, तुझ्या कामाचा? वाहवा, ग! म्हणे, भाजणी कशी होईल? माझ्याने नाही ओढवत जाते, समजलीस.' आजी मोठयाने बोलू लागली.
आईलाही चेव आला, संतापली ती. 'म्हणे,
सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला. परंतु एकही हात पुढे झाला नाही. कोणीही वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, 'घ्या, मी प्रेमाने देत आहे.' ते मजूर म्हणाले, 'स्वत:च्या श्रमाने मिळवावे. दुसर्यातने दिलेली देणगीही घेऊन कदाचित मनात आलस्य, मिंधेपणा व परावलंबन यांचा उदय व्हावयाचा. या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरविले आहे.'
तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला. केवढी ही विचारक्रांती! ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी