म्हणून? मी तयारी केली, जाते धुऊन ठेवले. परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच! दुसर्याणला तोंडघशी पाडता येते तुम्हाला. आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का?' आई म्हणाली.
"मी का हात लावीत नाही? शर्थ आहे बाई, तुझ्या बोलण्याची! नाही जात खर्यांफकडे, हो. तुझ्या डोळयांत खुपत असेल, तर नाही जात! जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हपापल्ये, होय? बाई, तू चांगले म्हण.'
मित्रांनो! पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की, ते घराबाहेर फार साळसूद असतात. दुसर्यामकडे ते चार धंदे करतील; परंतु घरी इकडची काडी तिकडे करावयाचे नाहीत. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाच्या स्तुतीला, मनुष्य लालचावलेला असतो. घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते, तर स्वार्थामुळे. वाहवा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते त्याज्य होय. माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते.
श्रमानेच खातो. हे दोघे समाजवृक्षावरील बांडगुळे आहेत. उन्हातान्हात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेली गुरे फाडणारा ढोर, वहाणा बांधणारा चांभार हे सारे, आयतेखाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत. काहीतरी निर्माण करा. विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा. काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे, निर्माण करा; तरच जगण्याचा तुम्हांस अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाजसंवर्धक, समाजरक्षक, समाजपोषक श्रमाची पूजा होते, ते राष्ट्र वैभवावर चढते. बाकीची भिकेस लागतात.