आई व आजी यांची भांडणे अशी नेहमी होत असत. ते काही नवीन नव्हते. परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे. मध्येच आलेले ते वादळ असे. परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे, घाण बाहेर निघून जाई व पुन्हा मने स्वच्छ होत. वादळ येते, ते शांत होण्यासाठी येते. रोग येतात. ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात व मरण येते, ते पुन्हा जीवनरस देण्यासाठी येते.
माझी आई शांत झाली. बोलेनाशी झाली. आजीचे थोडा वेळ सुरूच होते मधून मधून. 'लोकांकडे म्हणे काम करतात. माझे हात मी वाटेल तेथे काम करीन. तू कोण माझ्यावर लादणार, सक्ती करणार? तुला का माझा हेवा? मला लोक बोलावतात, तर तुला का मत्सर?'
आईचे तोंड बंद झाले, म्हणून आजीचेही बंद झाले. थोडया वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली, 'मी चुकल्ये, हो बोलू नये ते बोलल्ये. तुम्हांला मी कोण बोलणार? तुम्ही किती मोठया! परंतु अलीकडे या
माझ्या आईने मला स्वाभिमान शिकविला; मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकविले; दुसर्याजचे घेऊ नकोस, दुसर्या्स दे, हे शिकविले.
रात्र चौदावी: श्रीखंडाच्या वडया
आमच्या आईला श्रीखंडाच्या वडया फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वडया खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या त्या वडया करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारीपाजारी बोलावीत असत व आईही आनंदाने जात असे. दुसर्यारच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद.
पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती. पार्वतीबाई व आई यांची मैत्री