असे. कधी कोणी आजारी असले, कोणाला दमा लागला, तर आई करून देई. आईने दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खर्यांआकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली, 'जात्ये, ग येश्वदे. रागावू बिगावू नकोस, हो. मनात धरू नकोस.'
"तुम्हीच नका धरू मनात, म्हणजे झाले. कशा झाल्यात तरी तुम्ही वयाने मोठया. मी तुमच्या सुनेसारखी, लेकीसारखी, माझे बोलणे पोटात घालीत जा.' आई म्हणाली.
आजी गेली व आई घरकाम करू लागली. मित्रांनो! माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती. दोष कोणात नाहीत? चुका कोण करीत नाही? निर्दोष फक्त एक परमेश्वर. बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जगन्माऊलीसमोर जावयाचे आहे! चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण. माझी आई चुका करी; पण सावरून घेई. चुका करण्यातच ती ऐट मिरवीत नसे.'
रात्र बाविसावी: आनंदाची दिवाळी
"दिवाळीचे दिवस
मला वाटले होते की, राहील संक्रांतीपर्यंत. मलासुध्दा तिची करमणूक होती. यायची, गाणी म्हणून दाखवायची.'
पार्वतीबाई म्हणाल्या, 'तिच्या सासरचे पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून. मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे! आली चार दिवस, पुष्कळ झाले. त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्षे झाली, तरी माहेरी पाठवीत नाहीत. तिची आई त्या दिवशी रडली हो. त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना? मग या हं उद्या. वेणूला तुम्हांला बोलवायला पाठवीन. जात्ये मी.'
आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या. दुसर्यान