लोक येताना फटाके, खेळणी वगैरे दिवाळीसाठी मुलांना घेऊन येतात. माझा मोठा भाऊ पुण्यास मामांकडे शिकत होता. तो काही येणार नव्हता. परंतु पुण्याहून कोणसे आमच्या गावी आले होते. त्यांच्या बरोबर पुण्याच्या मामांनी आईला भाऊबीजेचे तीन रूपये पाठविले होते. आमच्यासाठीही खाऊ पाठविला होता.
ते तीन रूपये पाहून आईला आनंद झाला. तिने सर्वांची खुशाली विचारली. रूपये देऊन तो गृहस्थ निघून गेला. आम्ही आईच्या भोवती जमा झालो. 'मामाने खाऊ पाठविला. आम्हांला दे.' आम्ही तिच्या पाठीस लागलो. जरदाळू व पेपरमिंटच्या वडया होत्या. आईने एकेक जरदाळू व दोन दोन वडया दिल्या. माझा धाकटा भाऊ 'दोन जरदाळू पाहिजेत' म्हणून हट्ट धरून बसला. आई म्हणाली, 'अरे, तो तुमच्यासाठीच आहे. आज का एकदम संपवावयाचा आहे? पुरवून खाल्लात, तर तुम्हांलाच बरेच दिवस पुरेल.' तो म्हणाला, 'तर मग आणखी एक वडी दे आणि ही बदलून दे. मला
म्हणाली, 'जरा पडले, तो डोळा लागला. मी विसरल्ये नव्हत्ये. आता येणारच होत्ये. चल.'
आई वेणूकडे गेली व वडया करू लागली. निरनिराळया गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या. मी खेळून घरी आलो तो आई नाही. मी आईला शोधू लागलो. शेवटी वेणूताईकडे गेलो. मला अंगणात पाहताच, 'काय, रे श्याम! आईला पाहावयास आलास वाटते? ये, तुझी आई माझ्यासाठी वडया करिते आहे. मी उद्या सासरी जाणार आहे, श्याम.' वेणू मला बोलली.
मी म्हटले, 'जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागावली, तर माझी