गुलाबी रंगाची दे.' आईने त्याला वडी बदलून दिली व शिवाय आणखी एक दिली. आम्ही अंगणात खेळू लागलो. चिंध्याचा देशी चेंडू केला होता व धबाधबी आम्ही खेळत होतो.

आईने खाऊ फडताळात, मुंग्या न येतील, अशा व्यवस्थेने ठेवून दिला. थोडया वेळाने तिने मला हाक मारली. मी घरात गेलो. आई म्हणाली, 'श्याम, अमृतशेटजींकडे जाऊन नवीन धोतरजोडयास काय पडते विचारून ये. त्यांच्यासाठी हवा आहे, म्हणून सांग. घरात आहेत का, म्हणून त्याने विचारले, तर गावाला गेले आहेत, उद्या येतील, असे सांग. चौकशी करून येण्याला मला सांगितले, म्हणून आलो, असे सांग, जा.'

मी अमृतशेटजींच्या दुकानात गेलो. मोहन्या व बद्री त्यांचे मुलगे तेथे होते. मोहन्या मला म्हणाला, 'काय, रे, श्याम, काय पाहिजे? चित्रे पाहिजे असतील, म्हणून आलास होय ना?'

मी त्याला म्हटले, 'चित्रे देत नाहीस, मग कशाला मागू? मी तुझ्याजवळ कधी मागणार नाही. परंतु धोतराचा भाव विचारावयास मी आलो आहे.'


247 of 468

बाजू कोण घेणार?' मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले. 'ये श्याम! आपण केशराची पूड करू. तू ते वेलदोडे नीस व त्याचे दाणे काढ.' वेणूच्या कामात मी मदत करू लागलो. वेणूने केशर खलले व मी सहाणेवर वेलदोडयाची पूड केली.

'श्याम ! कशाला रे आलास?' आईने मला विचारले. आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले, 'मी काही वडयांसाठी नाही आलो. वेणूताई! मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास. मी मागितला होता का?'

वेणू म्हणाली, 'श्याम! तू चांगला आहेस. श्यामची आई! श्यामला रागे भरत जाऊ नका!'


247 of 773