'कोणाला धोतरजोडा? तुला?' त्याने विचारले.

'नाही, भाऊंसाठी. चांगला लांब-रुंद हवा. पोत चांगले हवे. किंमत काय, ते विचारावयास मी आलो आहे. दोन-तीन नमुने दे. ते मी घरी दाखवून आणतो.' असे मी सांगितले.

मोहन्या मारवाडयाने दोन-तीन प्रकारचे धोतरजोडे दिले. अमृतशेट म्हणाले, 'दाखवून लौकर आण, हो श्याम.'

'आम्ही काही घरी ठेवणार नाही व ठेवले, तर पैसे देऊ.' असे मी अभिमानाने म्हटले.

'तुझ्याजवळ भारी झालेत वाटते पैसे? बापाजवळ तर फद्या नाही!' अमृतशेट म्हणाले.

मला ते शब्द ऐकून वाईट वाटले, अमृतशेटांचे आम्हांला कर्ज होते, म्हणून ते तसे बोलले. स्वाभिमानाने जगू म्हणणार्याटने मरावे; परंतु कर्ज कधी काढू नये.

मी ते नमुने घेऊन घरी आलो व आईला दाखविले. त्यांतील एक आईने पसंत केला. किंमत बेताचीच होती. तीन, साडेतीन रूपये काही तरी होती. आईने मजजवळ पैसे दिले व म्हणाली,


248 of 468



आई म्हणाली, 'वेण्ये ! अगं, मला का माया नाही? एखादे वेळेस रागावते. पण त्याच्या बर्यागसाठीच. श्यामला जगाने नावे ठेवू नयेत, म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला. तो चांगला आहे. परंतु आणखी चांगला व्हावा, असे मला वाटते. पार्वतीबाई, पाक झाला हो. पाहा, गोळी झाली.

ताटात वडया थापण्यात आल्या. आई केळीच्या पानाने भराभर थापीत होती. पाच मिनिटे गेल्यावर आईने वडया पाडल्या व ती म्हणाली, 'पार्वतीबाई, थोडया वेळाने वडया काढून घ्या, मी आता जाते.'

वेणू म्हणाली, 'थांबा ना थोडा


248 of 773