'हा घेऊन ये. बाकीचे परत कर.' मी धोतरजोडे परत केले व एक विकत घेऊन आलो. आईने त्याची दोन पाने निरनिराळी फाडली व त्या प्रत्येकाला कुंकवाचे बोट लावून ठेवले.
वडील गावाहून परत आले, तरी त्यांना ही गोष्ट कळली नव्हती. दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगल स्नाने झाल्यावर आई वडिलांना नवीन धोतर नेसावयास देणार होती. आम्ही मुले होतो, तरी ती गोष्ट आम्ही फोडली नाही. आईच्या कटात आम्ही तिची मुले सामील झालो होतो.
उद्याची दिवाळी. आम्ही टाकळयाच्या शेंगा आणून त्यांतले इंद्रजव काढिले; ते वाटून आईने अंगाला लावण्यासाठी तयार करून ठेवले. पायाखाली नरकासुर म्हणून चिरडण्यासाठी कारिंटे आम्ही गोळा करून ठेवली. अंगण झाडून स्वच्छ केले. घाण दूर करणे म्हणजेच खरोखर नरकासुर मारणे. नरक हाच असुर आहे. नरक म्हणजे घाण. ह्या घाणीसारखा दुष्ट राक्षस कोण आहे? राक्षर शंभर माणसे खाईल; परंतु घाणीतून उत्पन्न होणारा रोगरूपी
वेळ. तुमच्या हातारे सारे करुन जा.' आईला नाही म्हणवेना. थोडया वेळाने आईने कलथ्याने वडया काढल्या. कशा सुंदर झाल्या होत्या ! पार्वतीकाकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली. वेणूची आई म्हणाली, 'श्याम, हे ताट खरवडून खा. घे.' मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले. पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वडया ठेविल्या व आई कुंकू लावून घरी गेली.
मी वेणूकडेच बसलो होतो. 'श्याम! तुझे सदर्याबचे बटण तुटले आहे वाटते. सदरा काढून दे म्हणजे नीट