होते. पोत, पेटया, सरीवाकी, गोटतोडे, सारे काही होते. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगले ल्यायला, चांगले खायला होते. एकत्र घरात कामही भरपूर असे. उत्साही परिस्थितीत, सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही. उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो.

"मित्रांनो ! माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा-अठरा वर्षांचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती. कारण आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देवघेव तेच पाहात. आम्ही आमच्या वडिलांस भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत. आजूबाजूच्या खेडयांतील लोक आम्हांला खोत म्हणून संबोधीत.'

"खोत म्हणजे काय?' भिकाने प्रश्न विचारला.


श्याम म्हणाला, 'खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून


25 of 468

जीवनकळया फुलत असतात, हे खरे. सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे मनुष्याचे व्यवहार, आई-बापांची कृत्ये, स्वच्छ, सतेज व तमोहीन अशी असतील, तर मुलांची मने कमळांप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशी फुलतील; नाहीतर ती किडींनी खाल्लेली, रोगट, फिक्कट, रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील.

मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे पाप नाही. स्वच्छ झर्या्चे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणार्यांानी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वसिष्ठऋषी वेदामध्ये वरूणदेवाला म्हणतात, "हे वरूणदेवा


25 of 773