राक्षस रस्त्यात ठेवला, तरी तो वाईटच. घाण रस्त्यात फेकू नये. म्युनिसिपालिटीच्या पेटया असतील, त्यांत जवळ जाऊन घाण टाकावी.

आम्ही सारे स्वच्छ करीत होतो. तुळशीचे वृंदावन आईने नवीन घातले. आईने पणत्या पुसून तयार केल्या. वाती तयारी केल्या. सायंकाळी त्या ठिकठिकाणी आम्ही लावल्या. पहाटे लवकरच उठावयाचे. म्हणून आम्ही मुले लौकर झोपलो. आई मात्र बराच वेळ काम करीत होती. उटणी वगैरे तयार करीत होती.

मोठया पहाटे उठून आईने बाहेरच्या चुल्यात विस्तव घातला. तिने स्वत: आपले न्हाणे आटोपले व मग आम्हां एकेकाला ती उठवू लागली. अंगाला उटणे, तेल चोळू लागली. आधी तेलाचे पाच ठिपके जमिनीवर काढून मग ती आमच्या अंगाला लावी. खूप पाणी आंघोळीला ती देत होती. वडीलही केव्हाच उठले होते. त्यांनी देवाच्या पूजेसाठी फुले आणून ठेवली. आमची स्नाने झाल्यावर ते आंघोळीस गेले.

आम्ही घरच्या देवाला नमस्कार केले व देवळातून सुध्दा


251 of 468



वेणू म्हणाली, 'निजल्यातशा? बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का?' वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला. 'श्यामची आई ! बराच आला आहे हा ताप!' ती खिन्नपणे म्हणाली.

मी म्हटले, 'वेणूताई! आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते. ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपीत होतो.'

वेणूने विचारले, 'मी तुम्हांस बोलावण्यास आले होते तेव्हा तुम्हांला बरे नव्हते वाटत का? म्हणून का तुम्ही पडला होतात? मला काय माहीत? तुम्ही बोललासुध्दा नाही. श्यामची आई! अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात?'


251 of 773