जाऊन आलो. आईने वडिलांना आंघोळीस पाणी दिले. त्यांची आंघोळ झाली. जुना कद नेसून त्यांनी देवाची पूजा केली. देवांना थोडे वासाचे तेल त्यांनी लावले. आज देवांनासुध्दा कढत पाण्याची आंघोळ. रोज बिचारे थंड पाण्याच्या अभिषेकात कुडकुडायचे! परंतु आज त्यांना गरम पाणी. वडिलांनी देवांची पूजा केली. करंजी-अनारशांचा नैवेद्य होता. पहाट झाल्यापासून भुत्ये भिक्षेसाठी येत होते. अंबाबाईची गाणी म्हणत होते, पै-पैसा, पोहे, करंजी मागत होते व आम्ही त्यांना घालीत होतो. वडिलांनी आम्हांला हाक मारली व देवांचा नैवेद्य त्यांनी आम्हांला दिला. रोजचे सूर्याचे नमस्कार घालून ते देवळात गेले. देवळातून थोडया वेळाने ते परत आले.

'माझे धोतर, ग, कुठे आहे आज? दिसत नाही ते.' त्यांनी आईला विचारले.

'त्यांची दोन अंगपुसणी केली. किती फाटले होते ते?' आई म्हणाली.

'अग, मग नेसू काय आज? आणखी महिनाभर ते गेले असते.' ते म्हणाले.

'त्याचा अंत तरी


252 of 468



आई म्हणाली, 'वेणू ! अगं, त्या वेळेस काही फार ताप नव्हता हो. अंग जरा कणकण करीत होते एवढेच. श्याम! जा, बाळ, दिवा लाव, तिन्हीसांजा झाल्या.'

मी दिवा लावला व देवातुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होते. ती गहिवरून म्हणाली, 'श्यामची आई! तुम्ही अंगात ताप असता वडया करावयास आलात म्हणून हा ताप वाढला. नसत्या वडया झाल्या तर नसत्या. आईने कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वडया जास्त आहेत?'

माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, 'अगं, अशा


252 of 773