किती पाहावयाचा? ते धोतर धुताना मला रोज लाज वाटत होती व वाईट वाटत होते.' आई म्हणाली.

'अग, मला नेसायला सुध्दा वाटत होती. परंतु करायचे काय? लाज वाटली, म्हणून वरून काही पैसे पडत नाहीत.' ते म्हणाले.

'हे धोतर नेसा आज.' आईने धोतर पुढे केले.

'हे कोठले? कोणी आणले?' त्यांनी विचारले.

'अमृतशेठकडून मी आणविले.' आई म्हणाली.

'अग, तो मला उधार देत नव्हता. मी त्याच्याजवळ मागितले का नाही? परंतु तो उधार देईना. 'माझी पूर्वीची बाकीच कशी वसूल होईल, हीच मला काळजी आहे. तुम्हांला उधार देऊन फसलो,' असे तो मला म्हणाला. तू घेऊन आलीस वाटते? का मोहन्याला बोलावून त्याला गळ घातलीस?' वडील चौकशी करू लागले.

'मी ते विकत आणले आहे. श्यामने जाऊन आणले.' आई म्हणाली.

'श्यामजवळ कोठले पैसे?' त्यांनी विचारले.

'मी दिले.' आई म्हणाली.

'तुझ्याजवळ कोठले?' त्यांनी विचारले.


253 of 468

एवढयाशा तापाने काय होते? वेणू, आम्हां बायकांना त्याचे काही वाटत नाही. अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावे, तरी धुण्याची मोट घेऊन ती आम्ही धुऊन आणतो. दहा माणसांचा स्वयंपाक करितो. असे मनाला लावून नको घेऊ. अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईन. जा आता तू घरी. आई तुझी वाट पाहत असेल.'

वेणू आईजवळ बसली. ती जाईना. मी वेणूस म्हटले, 'वेणूताई! त्या फुलांची माळ करतेस? आईला ताप आला आहे, तूच कर.'

वेणूताईने माळ केली. वेणू आईला म्हणाली, 'श्यामची आई! माझ्यासाठी हा तुम्हांला त्रास. हा ताप.'


253 of 773