'माझा आनंद तो तुमचाच आहे. तुम्हांला बाहेर चारचौघात जावयाचे असते. गंगूआप्पांकडे आज सोंगटया खेळायला बोलावतील, गेले पाहिजे. मला आज कोठे जायचे आहे बाहेर? पुढे सवड झाली. की आधी मला लुगडे घ्यावे. असे उगीच मनाला लावून घेऊ नये. आज दिवाळी; आज सार्यांढनी हसायचे, आनंदात राहायचे, आम्हांला आनंद देण्यासाठी तरी आनंदी व्हा.' आई म्हणाली.

'तुझ्यासारखी जन्माची सोबतीण व अशी गोड व गुणी मुले असल्यावर मी का आनंदी होणार नाही? मी दरिद्री नसून श्रीमंतांहून श्रीमंत आहे. मग मी का हसणार नाही, का सुखी होणार नाही? आण ते धोतर.' असे म्हणून आईच्या हातातून ते धोतर त्यांनी घेतले. ते ते नेसले व देवांना त्यांनी नमस्कार केला.

वडिलांचे नेसूचे धोतर पाहून आम्हांलाही आनंद झाला; परंतु खरा आनंद जर कोणाला झाला असेल, तर तो माझ्या आईला. तो अनुभव स्वत:च अनुभवून पाहावा लागतो. प्रेमपूर्वक त्यागातील आनंद त्याची चव तसे करीत गेल्यानेच समजू लागते. एकदा चटक मात्र लागली पाहिजे.


255 of 468

झाला? केवढे समाधान वाटते आहे मला! वडया करायला आल्ये नसते, तर मनाला सारखी रुखरुख लागली असती. जा हो आता घरी. मी सकाळी येईन. रात्री घाम येऊन ताप निघेल. सकाळी मोकळी होईन.'

वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली, 'श्याम ! चल तू आमच्याकडे. आईने भाजून चवळया केल्या आहेत व त्या पडघुलीभर तुझ्याजवळ देत्ये. मग तुझ्या आईने नुसता भात केला, म्हणजे झाले. नाही तर मी भात ठेवूनच जाते.'

rvbमाझी आई म्हणाली, 'वेण्ये! अग श्याम ठेवील भात, तू तोंडी लावणे पाठवून


255 of 773