मी म्हटले, 'मुळीच हात दुखत नाहीत. जात्याच्या खुंटयाला तुझा व माझा हात दोन्ही असतात. तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते. चल, मी अंगणात जाते घालतो. पोत्यावर जाते घालतो.' आईने घाल म्हणून सांगितले.
मी अंगणात जाते घातले. आईने दळण आणले. दुसर्याख दिवशी आंबोळया करावयाच्या होत्या. मला आंबोळया फार आवडत असत. मायलेकरे अंगणात दळत होती व चंद्र वरून अमृताचा वर्षाव करीत होता. मंद गार वारा सुटला होता. आई ओव्या म्हणत होती व ओव्यात 'श्याम बाळ' असे माझे नाव गुंफीत होती. मला आनंद वाटत होता.
दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते. कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे. आईबरोबर दळीत असता मी जात्यात वैरण घालावयासही शिकलो होतो.
आम्ही दळीत होतो. दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकीवयनी आल्या.
'बाई, हे काय, श्याम का दळतो आहे? मी म्हटले, 'आज रात्री
'जा बाळ! भात झाला असेल, तर उतरून ठेव; नाही तर खालून ओढेल.' आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला. दुसर्याे दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हां सर्वांना वाईट वाटले. त्या श्रीखंडाच्या वडया मला अद्याप आठवतात. वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या. वेणूसुध्दा जगली नाही; परंतु ते प्रेम अजून आहे. ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात; परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात.
रात्र पंधरावी: रघुपती राघव राजाराम
लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळया