आई म्हणाली, 'बाळ, ध्रुवाची पूर्वपुण्याई केवढी थोर! त्याचा निश्चय किती अभंग! बाप राज्य द्यावयास लागला, तरी तो माघारी फिरला नाही. इतके दृढ वैराग्य कोठून आणावयाचे? या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर. मग केव्हा तरी देव भेटेल!'

जानकीबाई म्हणाल्या, 'श्याम! सोड, मी लावते आता हात. दमला असशील तू.' मी आईला म्हटले, 'आई, तूच जरा हात सोड. जानकीवयनी व मी दळतो. जानकीवयनी, मला वैरण घालता येते. डोळे मिटूनसुध्दा घालता येते. मी आता तरबेज झालो आहे. आई, सोड ना हात थोडा वेळ.'

मी आईचा हात सोडविला व जानकीवयनी आणि मी दळू लागलो. मी वैरण घालू लागलो. 'जानकीवयनी! पाहा, कसे पीठ येत आहे, ते? डोळयात घातले, तरी खुपायचे नाही. पाहा ना.' मी त्यांना म्हणालो.

जानकीवयनी आईला म्हणाल्या, 'बाई, श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत!'

आई म्हणाली, 'माझ्या घरात कोण आहे


260 of 468



प्रल्हादरक्षका मनमोहना । पावे आम्हा सत्वर

द्रौपदीलज्जानिवारणा । पांडवारक्षण मधुसूदना

गोपीजनमानसरंजना । पावे आता सत्वर

अनाथनाथा रूक्मिणीवरा । भीमातीरवासी विहारा

जगद्वंद्या जगदुध्दारा । पावे आता सत्वर

वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गदित होते.

आम्ही त्या वेळेस फार मोठे नव्हतो. मराठी पाचवीत मी होतो. वय अकरा वर्षाचे होते नव्हते. परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही त्या वेळेस मी मोठा होतो. त्या वेळेस ना शंका, ना संशय. गोड श्रध्दाळू भावमय भक्ती


260 of 773