त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घरी पुरूषमंडळी नसेल, तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणे, हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला. असे म्हणता येईल. ह्यालाच मी लग्न म्हणतो, लग्न करून हेच साधावयाचे. लग्न करून पुरूष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो. स्त्री बुध्दीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुध्दी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरूषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे व स्त्रीजवळ पुरूषगुण येणे म्हणजे विवाह होय. अर्धनारीनटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वत: पुरूष अपूर्ण आहे. स्वत: एकटी स्त्री अपूर्ण आहे. परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. दोन अपूर्णांच्या लग्नाने दोन पूर्ण जीव जणू बनतात. निराळे लग्न लावण्याची आई मला जणू जरूरच ठेवीत नव्हती. प्रेम, दया, कष्ट, सेवा या स्त्री-गुणांशी आई माझे लग्न लावून टाकीत होती.'


रात्र चोवीसावी: सोमवती अवस


262 of 468



त्या वेळीची ती भोळी श्रध्दा चांगली, की आजचा संशय चांगला, मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या. मी गोष्ट सांगणार आहे, ती निराळीच.

चातुर्मास्यात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणी तरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी चार, साडेचारच्या सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. त्या वेळेस आजोळच्या घरी आम्ही राहात होतो. देवळातील पुराण जर मोठयाने सांगितले, तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला दहा-पाच पुरूष व दहा-वीस बायका बसत असत.


262 of 773