पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्या वेळेस घातल्या होत्या; परंतु आता गरिबी आली होती. तिलाच नेसावयास लुगडे नव्हते; तर १०८ लुगडी कोठून देणार? तिलाच खावयास नव्हते, तर ती काय देणार? सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही. घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार? पतीजवळ काय होते?
नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो. सोमवती आली होती मी आईला विचारले, 'या सोमवतीला तू काय घालणार? काय ठरविले आहेस? जानकीवयनी १०८ सुपार्याो-ओल्या सुपार्याव घालणार आहेत.'
आई म्हणाली 'बाळ, १०८ पोफळी माझी घालून झाली आहेत. मागे सीताआत्याने पाठविली होती.'
'मग तू काय घालणार आहेस? दोन दिवस तर राहिले सोमवतीला. काही ठरवावयास हवे ना! आई! १०८ गूळ म्हणजे का १०८ गुळाच्या ढेपा वाहावयाच्या! १०८ तेल म्हणजे का १०८ तेलाचे डबे द्यावयाचे!'
आई म्हणाली, 'कोणी १०८ डबे दिले,
असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो.
प्रभुसवे लढू आम्ही कुस्ती
प्रेमाची चढली मज मस्ती रे
प्रेमाची चढली मज मस्ती
आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्रीबोवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना. 'काय शिंची कार्टी!' असे कोणी म्हणू लागले. 'हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे-येथे पुराण चालले, समजू नये का?' पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे? त्यांनी बंद नको का करायला!' 'अहो, पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवितात.' अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो.