चिंचोकेच काय, पण १०८ दगड जरी देवाला दिलेत, तरी त्याला खडीसाखरेप्रमाणे गोड लागतील. ते प्रेमाने दिलेले दगड तो चघळीत बसेल, शतजन्म चघळीत बसेल व म्हणेल, भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला. पटकन फुटत नाही. विरघळत नाही. एकेक खडा तोंडात धरून ठेवावयास वर्ष पुरेल. श्याम! देवाला रे काय? त्याला काहीही द्या; परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे. श्याम! द्रौपदी, शबरी यांच्या भक्तीइतकी माझी कोठे आहे भक्ती? मला कोठे तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत? आपली नाही हो तितकी लायकी.'

'मग तू काय घालणार आहेस, सांग ना. ठरविले असशील काही तरी.' मी विचारले.

आई म्हणाली, 'मी १०८ फुले वाहणार आहे. फुलासारखे निर्मळ व शुध्द दुसरे काय आहे? फुले वाहीन, हो मी.'

आई म्हणाली, 'श्याम! जे वाहावयाचे, ते देवासाठी असते. ते भटजीसाठी नसते. देवाच्या पायांवर


267 of 468



'आम्ही नाही बंद करणार जा. त्यांचे पुराण चालले आहे, तर आमचे भजन चालले आहे.' माझा एक मित्र म्हणाला.

'अरे श्याम, जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि ह्या झांजा? मोठयाने ओरडले म्हणजेच देव मिळतो, असे नाही. आपल्यामुळे जर दुसर्यातला त्रास होत असेल, तर ते रे कसले भजन?' आई शांतपणे म्हणाली.

'साधुसंतसुध्दा टाळ वाजवीत व भजन करीत.' मी म्हटले.

'परंतु मुद्दाम दुसर्या ला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत. इतरांना त्रास झाला असता, तर त्यांनी


267 of 773