वाहिलेले फूल भटजीस घ्यावे वाटले, तो थोर प्रसाद आहे, असे त्याला वाटले, तर घेईल. नाही तर देवाच्या पायावर फूल राहील. आपणांस दुसरे काही देता येत नाही, तर काय करावयाचे? देता येईल, ते देवाला द्यावे.'

'मग कोणती १०८ फुले वाहणार आहेस? आपणांकडे फुले तरी चांगली कोठे आहेत? नाही तर, आई! १०८ पानेच वाहा. १०८ तुळशीची पाने, १०८ बेलाची पाने, १०८ दूर्वा, आई! देवाला फुलांपेक्षा पानेच का, ग जास्त आवडतात? कितीही फुले असली, तरी तुळशीपत्र, दूर्वा, बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दूर्वा, शंकराला बेल. त्यांना फुलांपेक्षा यांचीच आपली जास्त आवड कां, ग, आई? असे मी विचारले.

आई म्हणाली, 'तुळशीपत्र, दुर्वा वगैरे मिळावयास त्रास नाही पडत. वाटेल तेथे होतात. थोडे पाणी घातले, की झाले. फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलावयाची. परंतु पाने आपली नेहमी


268 of 468

भजन थांबविले असते. श्याम, तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजविणे प्रिय आहे?' आईने विचारले.

'वाजविले म्हणजे आई, रंग चढतो. नुसते नाव कंटाळा आणील.' मी म्हणालो.

'हळूहळू टाळया वाजवा. ताल धरा, म्हणजे झाले. मुद्दाम अडून बसू नये. वाजविणे ही महत्त्वाची गोष्ट नाही. तुम्हांला देवाच्या नावापेक्षा आरडाओरड व वाजविणे हेच आवडते? श्याम, ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसर्यााला त्रास होतो, ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसर्यातच्या पूजेच्या आड येऊ नये, माझी प्रार्थना दुसर्या्च्या प्रार्थनेच्या आड येऊ


268 of 773