तिला वाटू नये, म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, 'का ग, डोक्यावर का द्यायली हवी आहे मोळी? मी देतो.' असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो.

'नको रे दादा, तुम्ही बामण. कोणी पाह्यलं, तर मारतील मला! नको रे दादा. जा, बाबा. कोणी येईल महारवाडयातून वरंड वगैरे घेऊन, तो देईल डोईवर.' असे ती गयावया करून विनवू लागली.

'अग, मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो, घे' असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढविली.

'अरे श्याम! ती महारीण ना? अरे, तिला शिवलास काय? एवढयात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं? भाऊरावांना सांगितलेच पाहिजे.' श्रीधरभट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि 'श्याम! अगदीच च्येवलास तू. अरे, काही ताळतंत्र तरी!' असे ते बोलू लागले.

मी त्यांना म्हटले,


273 of 468



त्या वर्षी कन्यागत असल्यामुळे वाईला हजारो स्त्री-पुरुष यात्रेला जात होते. आमचा लहानसा पालगड गाव वाईपासून कित्ती दूर! परंतु आमच्या गावाहून बैलगाडया करून किती तरी लोक जात होते. माझे एक चुलत आजोबा-माझ्या आईचे चुलते-त्यांच्या पत्नी व इतर गावातील बरीच मंडळी जाण्याचे ठरत होते. चांगल्या दहा-बारा गाडया एकदम निघणार होत्या. पालगड ते खेड व खेड ते चिपळूण असे मुक्काम करीत त्या गाडया जाणार होत्या. वाटेत रानात उतरावे, नदीकाठी मुक्काम करावा, पिठलेभात करावा, जेवावे व पुढे जावे,


273 of 773