'मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर बाटविणार नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जावयाला. नदीतून जावयाचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. 'स्नानात् शुध्दी:' हे मला माहीत आहे.' असे म्हणून मी तेथून गेलो.
मी घरी आलो. आई म्हणाली, 'त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कोठे लांब जाईल गोयला घेऊन? पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही सरली आहेत. जा, हाक मार तिला.'
'ए गोयलेवाली! अग, इकडे ये.' मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरविले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, 'म्हाता-ये, आजारी का गं आहेस?'
'व्हय, माय. ताप लई येतो. काय करातांव, पोटाला हवं ना!' असे ती म्हणाली.
'दुपारचा भात उरलेला आहे. शिळा झाला आहे. देऊ का तुला?' आईने विचारले.
असे करीत मंडळी जाणार होती. अशा प्रवासात खूप मजा येते. मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही. सृष्टिमाईजवळ एक मिनिट उभे राहावे व जावे, त्यात काय आनंद! आईच्या मांडीवर लोळावे, तिच्याजवळ बसावे, खेळावे. यातील सुख, त्याचे वर्णन का करता येईल? निसर्गही आपली माताच. त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ? तिच्याजवळ घटका घटका राहू या. या बैलगाडयांच्या प्रवासात फार मौज असते. रात्रीच्या वेळी तर फारच आनंद. शांत वेळ असते. झाडांमधून वरचे तारे व चंद्र