'द्या, आई, देव तुमचे भले करो. गरिबाचे दुनियेत कुणी नाही, बघा!' दीनवाणी म्हातारी बोलली.
आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला.
'वायच पाणी घालताव, दादा?' ती मला म्हणाली.
पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली.
'चल, श्याम, तू आंघोळ कर.' आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसर्याव दगडावर बसलो. मग स्वत:च्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, 'आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही, एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवात जेवत होतो. पुरणपोळी खात होतो, आग्रह होत होता; भास्करभटजींना इतका आग्रह झाला, की ते रागावून उठावयास लागले. परंतु आपटयांनी
मधून मधून डोकावत असतात. बैलांच्या गळयांतील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो! आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा, त्याचे ते आगीसारखे, तार्यां सारखे डोळे!... हाकारे करावे व वाघ पुन्हा जंगलात शिरावा. त्या बैलगाडयांच्या प्रवासात हे सारे अनुभव मिळत असतात.
लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मलाही वाटले, की आपणही वाईस या सर्वांबरोबर जावे. मी आईच्या पाठीमागे लागलो होतो; परंतु माझे कोणी ऐकेना. मला फार वाईट वाटले. मी आईला म्हटले, 'आई! जाऊ दे ना मला! मी