त्यांना बसविले. परंतु बाहेरच्या त्या महारणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळयाचे पाणी वाढीत होते; परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती, 'घास घाला हो, दादा.' आई? तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे, तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव नाही माहीत- ते मुंबईला नोकरीस असतात व पीतांबर नेसलेले होते. ते वाढीव होते- ते एकदम मांडवाबाहेर गेले व म्हारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, 'लाज नाही वाटत भीक मागायला या वेळी! अजून जेवणेही झाली नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आत ब्राह्मण जेवतात, तर तेथे ओरडत बसली! तुम्ही अलीकडे माजलीत म्हारडी! नीघ, का मारू वहाण फेकून?' असे म्हणून आई, त्या पीतांबरधारी मनुष्याने खरेच वहाण उचलली. 'नको, रे दादा. नको रे मारू. जात्ये, रे दादा.' असे म्हणत ती निघून


276 of 468

वाटेत हट्ट करणार नाही. खोल पाण्यात जाणार नाही. तात्या (माझे चुलत आजोबा) सांगतील तसा वागेन. भाऊंना (वडिलांना) सांग, म्हणजे ते नाही म्हणणार नाहीत. आई! त्या पोथीत... स्नानाचे महत्त्व आहे म्हणून मी माघस्नान, कार्तिकस्नान सारी केली. मला गंगेचे स्नान करून येऊन दे. तुझा मुलगा पुण्यवान नको का व्हायला?'

आई म्हणाली, 'श्याम! अरे, आजच्याने काय झाले? तू पुढे मोठा हो व जा गंगा-गोदांना भेटायला. आज आपण गरीब आहोत. नाही म्हटले, तरी पाच-सहा रूपये तुझ्याकरिता द्यावे लागतील. कोठून


276 of 773