गेली. आई, हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात. दुसर्या चे जोडे पुसतात. यांची ह्या आपल्या गावात ऐट व मिजास! मघाची ती म्हारीण नाही का म्हणाली, 'गरिबाला कोणी नाही,' तेच खरे. आई! उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला, तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील. त्याला पानसुपारी, अत्तर, गुलाब करतील; त्याच्या गळयात हार घालतील आई! पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म? हाच का, ग, ह्यांचा देव? हातात वहाण घेऊन त्याचा पीतांबर बाटला नाही. पायांत पायतणे घालून ही सोवळी, हे मुकटे, कद हातात घेऊन खुशाल जातात; परंतु ही वहाण ज्याने ह्यांना पायांत घालावयास दिली, तो मात्र घाणेरडा! त्याची सावलीही नको! आई ! हे कसे, ग? हे कसले सोवळे! हा का धर्म? देवाला हे आवडेल का, ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे, नाही?

आई म्हणाली, 'बाळ! जगात सारे पैशाला,


277 of 468

आणायचे, बाळ पैसे? आईबापांची आज्ञा हीच तुझी कृष्णा, हीच गंगा. पुंडलीक आईबापाचे पाय सोडून, समोर देव आला तरी उठला नाही. तो त्यांचे पाय चेपीत बसला. खरं ना?'

परंतु मी म्हटले, 'आई! ध्रुव तर आईबापांना सोडून गेला. पुराणात दोन्ही प्रकार आहेत. आई! पुढचे कोणी पाहिले आहे? चांगले करावयाचे मनात आले, की लगेच करावे. त्याला वेळ बघत बसू नये, असे त्या सत्यनारायणाच्या कथेत नाही का? आई, जाऊ का? तात्यांना सांगितले, तर ते मला फुकटसुध्दा नेतील. ते का पैसे मागतील?'

आई


277 of 773