सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना. ते गरीब होते. तेव्हा त्यांना सारे पंडया पंडया म्हणून हाका मारीत; परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वर्हा ड-खानदेशात फावडयांवारी पैसा मिळविला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना 'पंढरीनाथ बाबा' म्हणू लागले. कुणाच्याही घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसावयास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, 'तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता; मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही.

हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हांला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत.' श्याम, असे ते म्हणावयाचे. महारामांगाजवळ पैसे नाहीत, म्हणून


278 of 468

म्हणाली, 'अरे ते पैसे घेणार नाहीत, हा त्यांचा मोठेपणा; परंतु असे आपण ओशाळवाणे जावे का? दुसर्याहवर बोजा घालावा का? दुसर्यां च्या जिवावर देवाची पूजा नाही करता येत. दुसर्यां नी लावलेल्या व वाढविलेल्या फुलझाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात काय रे स्वारस्य? स्वत: श्रमावे, स्वत: मिळवावे व देवाला अर्पण करावे. जायचे असेल, तर पायी जा. आहे ताकद?

मी म्हटले, 'आई! मी दमून जाईन. सहा कोस चालेन. परंतु पुढे? आणि गाडया पुढे निघून जातील. मला सोबत? मला भीती वाटेल आणि गाडयांबरोबरच


278 of 773