'आई ! दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटते. तर त्याने ते रूप धारण केले असते का ग?' मी विचारले.

आई म्हणाली, 'श्याम! देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. ह्यातील अर्थ हाच, की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणाच्या देहात आहे, माशाच्या आहे, महाराच्याही आहे. देव गजेंद्राच्यासाठी धावतो, घोडयांना खाजवतो, गाई चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते. त्याला गुह कोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम! देवाला सारी प्रिय आहेत. कारण सारी त्याचीच. तू माझा, म्हणून मला आवडतोस; तशी आपण सारी देवाची, म्हणून सारी त्याला आवडतो. मला आवडेल, ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल, ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, परंतु श्याम


280 of 468

पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील. त्याला भूक लागली, तर गाय-माऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडील. देवाकडे जो जावयास निघाला, त्याला सारे मित्र, सारे सखे. त्याचे सारे गडी, सारे साहाय्य करणारे. आहे का ध्रुवाची श्रध्दा? त्याचा तो भाव? वेडा! हे काय? रडावयास काय झाले? अरे, आपण लहान माणसे. अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत. वेडा हट्ट घेऊ नकोस.'

मला खूप वाईट वाटले. उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती. गाडयांच्या पाठोपाठ त्यांना न दिसू,


280 of 773