! ज्याचे आपल्या आईबापांवर, बहिणभावावर प्रेम नाही, तो महारावर, मांगावर करील का? आधी घरातील सार्यांयवर प्रेम करा. मग एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले, म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी काय तुला सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळते? तू मोठा झालास, म्हणजे तुला कळेल.'

आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणी तरी 'श्याम श्याम' म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो.

मित्रांनो! आपण खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे वाद पुरून टाकू या. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे, हे लक्षात धरू या. हे जोपर्यंत होत नाही, तो पर्यंत मी असेच म्हणणार.

(पद चाल- मेरे मौलाबुला)


माझ्या भारती या देव मुळी नुरला ।

सगळा अंधार रे भारतांतरि भरला? ॥ माझ्या ॥

नाहि दया स्नेह तिथे देव का असे


281 of 468

अशा रीतीने आपण जावे, असे मनात येत होते. आपण दमू, थकू, आपणांस भूक लागेल, खायला काय?.. नाना शंका मनात येत होत्या; पाणी प्यावे व झाडाचा पाला ओरबाडून खावा, बकरी पानांवर जगते, आपण जगू. चिंचेची, करवंदीची कोवळी पाने खाऊ, असे मनात योजत होतो. रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली, ते कळलेही नाही. मी उठलो, तेव्हा सार्यास गाडया निघून गेल्या होत्या. त्या दिवशी शनिवार होता, शाळा होतीच. मी पटकन परसाकडे, तोंड धुणे आटोपले. झटपट आंघोळ केली. संध्या केली.


281 of 773