गुलकंद देणे सर्वात चांगले. परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद? पैसे कोठून आणावयाचे? माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला.

कांदा फार थंड असतो. कांदा फार स्वस्त आहे. पौष्ठिकही आहे. कांद्यात फॉस्फरस आहे, असे डॉक्टर सांगतात. तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू. कारण नेहमी कांदा असेच. कांदा-भाकर खाणार्यार मावळयांनीच केवढा पराक्रम केला! शारीरिक श्रम भरपूर करणार्यां स कांद्यापासून अपाय नाही. परंतु केवळ बौध्दिक श्रम करणार्या स मात्र तो बरा नव्हे.

कांद्याचे गुणधर्म काही असोत. माझ्या आईने कांद्याना अर्धवट वाफ दिली. वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले. हा कांदेपाक फार थंड असतो. असे सांगतात. आई माझ्या मोठया भावास रोज पाकातील दोन तीन कांदे देऊ लागली.

मी एक दिवस आईला म्हटले, 'आई! आम्हांला कधी पाकातला कांदा देऊ नकोस, हो. मी तुझा नावडताच मुळी. दादाला कांदे नि बिंदे.


283 of 468

की नाही तू? राजाच्या तरी पोटी यायचे होते. भिकार्या च्या घरात जन्मून राजाची ऐट रे कशी चालणार? चांगली पानगी देत्ये, ती नको म्हणतो, दुपारी पण नको जेवूस. खायची भूक नाही म्हणे. किती दिवस राहतोस उपाशी, ते तरी बघत्ये. श्याम, मागे फीर, आईचे ऐकावे हो सांगितलेले.'

परंतु मी न ऐकता झपाझप जात होतो. अजून शाळेत मुले यायला लागली नव्हती. वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला व 'देवा! माझा निश्चय तू टिकव. तू माझा साहाय्यकारी हो.' अशी प्रार्थना केली. मी शाळेत गेलो. तेव्हा एकसुध्दा मुलगा शाळेत आला नव्हता. शाळा, अद्याप उघडलीही नव्हती.


283 of 773