त्याला भातावर तूप जास्त, दही जास्त, आम्हांला काही नाही. आम्ही जवळचे ना! आम्ही नेहमी घरी येतो. आम्हांला कोण विचारतो! जवळ असे ते कोपर्यासत बसे, लांबचे स्वप्नी दिसे. आहे, बोवा! दादाची मात्र चमाण आहे. मला तरी देवी आल्या असत्या, तर बरे झाले असते! मिळाला असता कांदेपाक, मिळाले असते दही-दूध, मिळाले असते गाईचे तूप!'
माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले. माझा दादा थोर मनाचा होता. शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते. परंतु मुकाटयाने सारे सहन करीत असे. माझ्यासारखा खटयाळ, खोडसाळ तो नव्हता. शांत व धीमा होता. समुद्र जसा आत वडवानळाने जळत असतो, तसा तो आत दु:खाने, अपमानाचे जळे; परंतु तोंडातून ब्र कधी काढीत नसे. तो मनातील दु:ख कधी कोणास सांगत नसे. स्वत:चे दु:ख, स्वत:ची करूण कहाणी दुसर्यांस सांगून त्याला आणखी का दु:ख द्या, असे तो म्हणे. दादा आईला म्हणाला, 'खरेच,
माझे दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवले व मी शाळेतून बाहेर पडलो. मुलांनी मला पाहू नये, म्हणून मी झपाटयाने जात होतो. मी गावाबाहेर आलो. गावची नदी ओलांडली व पुढे चाललो. तिठ्ठयावर आलो. जेथे तीन रस्ते फुटतात, त्या जागेला तिठ्ठा म्हणतात. एका बाजूला दापोलीचा रस्ता होता, एका बाजूला खेडचा होता. मी खेडचा रस्ता धरला व चालू लागलो. पहाटे निघालेल्या गाडया किती तरी लांब गेल्या होत्या. त्या गाडया दहा-अकरा वर्षांचा मुलगा कशा गाठणार? मला माझे भानच नव्हते. परंतु ऊन लागू लागले. मी