आई, मला एकटयाला खायला लाज वाटते, हो. उद्यापासून मला देऊ नकोस. सार्यांलना देणार असशील, तरच मला दे. देवी बर्याय झाल्या. आता काय? बरणीत आहे, तो चार दिवस आम्ही सारी मिळून खाऊ.'

आई म्हणाली, 'अरे, तुम्ही माझी कुणी सावत्र का मुले आहात. श्याम! असे, रे, काय घालून पाडून बोलतोस! अरे, त्याच्या तळपायांची, डोळयांची सारखी आग होत असते, रात्री तळमळत असतो, त्याला झोप येत नाही. हे तुला माहीत नाही का? त्याला थंडावा मिळावा, म्हणून हे औषध आहे. खाण्यासाठीच का जन्म आहे? म्हणे, मला का नाही देवी आल्या? श्याम, अरे असे म्हणावे का? देवाला काय वाटेल? चांगले धडधाकट शरीर दिले आहे; तर तुला नसती भुते आठवतात. असे करू नये. श्याम, तू का आता लहान आहेस? मग पोथ्या-पुराणे कशाला, रे वाचतोस ती? रामावर लक्ष्मणाचे-भरताचे किती प्रेम! उगीचच वाचायचे वाटते? काही त्यातला गुण घ्यावा. तुझाच


285 of 468

दमून गेलो. मला रडू येऊ लागले. घरी परत जाण्याची लाज वाटू लागली. परंतु घरी नाही जावयाचे, तर कोठे जावयाचे? रानात कोठे राहणार आणि किती वेळ राहणार?

मी माघारी वळलो, माझ्या गावाकडे पावले वळविली. डोळयांतून पाणी गळत होते व सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जात होते. जणू सूर्याचे किरण माझे अश्रू पुशीत होते. भर दुपार होण्याची वेळ. सूर्य डोक्यावर आला. मी घामाघूम झालो. सकाळपासून पोटात काही नव्हते. मी पालगड गावाजवळ आलो. परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली. स्वाभिमान


285 of 773