ना तो भाऊ, का कोणी परका आहे? अरे, परक्याचाही हेवा करू नये. परक्यालाही तो आजारी असेल, तर द्यावे. तू घरी आलास, म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळीत? कढत पाणी देत? तू घरी आलास, म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत? नारळीपाकाच्या वडया, नाही तर दुसरे काही तरी नाही का करून देत बरोबर? भावाचा का असा मत्सर करावा? पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडेही नाही रे पाहणार! असे नको हो करू श्याम!'

दादा आईला म्हणाला, 'आई! तू उगीच मनाला लावून घेतेस. श्यामच्या मनात नसते हो काही. चल, तू आम्हांला आज पानग्या करून देणार आहेस ना? मी आणू केळीचे फाळके काढून?'

आई म्हणाली, 'जा रे, श्याम, फाळके काढून आण. सुयर्यानचे पाने नको, हो कापू! ते पानकापे घे व वरची पाने काप, जा.'

मी गेलो व पानकाप्याने केळीच्या उंच गेलेल्या डांगा कापून खाली पडल्या. पाने नीट कापून घरी आणली. 'अण्णा! टाटोळा मला वाजवायला दे. मी फटेफटे करीन.' बाबुल्या म्हणाला.


286 of 468

म्हणे, 'गावात जाऊ नको. परत घरी जाऊ नकोस.' पोट म्हणे 'घरी जा' घरी न जाण्यात कसला स्वाभिमान? आई-बापांशी का स्वाभिमान दाखवायचा? प्रेम करणार्यारसमोर स्वाभिमान दाखविणे म्हणजे प्रेमाचाच अपमान आहे.

गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही. गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते. ही आमची ग्रामदेवता. बाळंतिणी बाळंतपणातून उठल्या, की मूल घेऊन झोळाईला जातात. तिची खणानारळांनी ओटी भरतात. माहेरवासिनी सासरहून आल्या तर झोळाईला जातात. मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो. त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे. अंधारात लपून बसलो.


286 of 773