'दादा म्हणाला, मग विटीदांडू खेळावयास येतोस?'
'माझे अडले आहे खेटर! मी नाही येत जा!'
फणकार्या ने मी निघून गेलो. दादावर माझे प्रेम नव्हते; परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहात होतो! ती वंचना होती. जो भावावर प्रेम करीत नाही, तो झाडावर काय करणार!
दुपारची जेवणे झाली. दादा पडला होता. तो आपले तळवे हातांनी कुरवाळीत होता. त्याच्या तळपायांची सारखी आग होत असे. आज इतकी वर्षे झाली, तरीही त्याच्या तळव्यांची आग होते; मग त्या वेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला. दादाच्या पायांवर मी रोज पाय देत असे. त्याला त्यामुळे बरे वाटत असे. परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो. दादा माझ्याकडे पाहात होता; मुकेपणाने मला बोलावीत होता. परंतु त्याच्या पायांवर पाय द्यावयाचे नाहीत, असे मी ठरविले होते. मी दुष्ट झालो होतो. माझ्यामधील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते. त्या दिवशी मी फत्तर झालो होतो. दादाने शेवटी
पडले. ते माझे चुलते होते. गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता. चुलते, वडील, घरची, शेजारची सारी माणसे मला धुंडीत होते. शाळेतील मुलांनी पाटीदप्तर घरी आणून दिले; तेव्हा कळले की मी हरवलो.
आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडी पुस्ती वाईट आली होती, म्हणून मला मारले होते. मी निघून गेलो, त्यामुळे पुन्हा आज मार बसेल कदाचित, म्हणून गेलो असेन, असं हेडमास्तरांस वाटले. ते हेडमास्तर फार मारकुटे होते. निगडीच्या काठयांचा भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवीत व मुलांना गुरासारखे झोडपीत.