मला हाक मारली व तो म्हणाला, 'श्याम! देतोस का रे तळव्यावर पाय? मला तुला सांगायला लाज वाटते, हो. रोज रोज तरी तुला किती सांगावयाचे? पण श्याम, मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार. येथे तू आहेस, म्हणून सांगतो, दे रे जरा.'
दादाच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो. परंतु अहंकार होता. अहंकार वितळला नव्हता. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात. त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात. परंतु त्या वेळेस मी ठरविले होते. दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही. मी काही केल्या उठलो नाही.
आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते. ती हात धुऊन आली. मी जागचा हाललो नव्हतो, हे तिने पाहिले. ती दादाजवळ आली व म्हणाली, 'गजू! मी देते हो, तुझ्या पायावर पाय. त्याला कशाला सांगतोस? त्याला कशाला त्रास देतोस? तो कोण आहे तुझा? भाऊ सख्खे दाईद पक्के!' असे म्हणत आई खरेच दादाच्या पायांवर,
छत्रीच्या लोखंडी काडीनेसुध्दा मुलांच्या उपडया हातावर, बोटांच्या पेर्यांनवर ते मारीत. ते गांजा ओढीत असत व तर्र होऊन येत असत. त्यांची बदली व्हावी, म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो. मी पळून गेलो, म्हणून त्यांना वाईट वाटले. आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला, असे त्यांनी मनात घेतले. ते जरा घाबरले. या श्यामने विहिरीत जीवबीव तर नाही ना दिला. अशी त्यांना धास्ती वाटली. शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले, तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या पुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली. वडिलांना